मुंबई: गेल्या रविवार पासून मुंबई. ठाणे, पालघर जिल्ह्यात कोसळणाऱ्या अतिवृष्टी मुळे रेल्वे सेवा पूर्ण कोलमडली असून मुंबईत जाणाऱ्या-येणाऱ्या अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे मुंबईत अनेक प्रवाशांना आपला प्रवास रद्द करवा लागला आहे. अतिपावसामुळे मुंबईतील जीवन वाहिनी समजली जाणारी लोकल सेवा धीम्या गतीने चालू आहे. प्रशासनाने आज सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे.
मुंबईतील अनेक रेल्वे स्थानक पाण्याखाली गेल्याने खबरदारीचा उपाय म्हणून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे प्रशासनाने ट्विटरवरून रद्द झालेल्या आणि अर्ध्या वाटेतूनच परतणाऱ्या गाड्यांची यादी प्रसिद्ध केली आहे.
रद्द झालेल्या गाड्या
रत्नागिरी-दादर-रत्नागिरी पॅसेंजर, मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, मुंबई-पुणे-मुंबई इंटरसिटी एक्स्प्रेस, नांदेड-मुंबई-नांदेड तपोवन एक्स्प्रेस, मनमाड-एलटीटी-मनमाड, मुंबई-गदग एक्स्प्रेस, गदग-मुंबई एक्स्प्रेस, मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस या गाड्या रद्द झाल्या आहे.