अत्याचारप्रकरणी फाशीची शिक्षा द्या

0

जळगाव । सध्या बलात्कार, अत्याचार, असे प्रमाण खुप वाढले आहे. दिवसा ढवळ्याही मुली महीला सुरक्षीत नाही, असे प्रश्‍नचिन्ह सध्या निर्माण होत आहे. आताच काही दिवस अगोदर समतानगर मधील अक्षरा याला बळी पडली, पण असे कोणांवर होता कामा नये. यासाठी सर्व शाळा महाविद्यालयामध्ये महीला व मुलींच्या संरक्षणार्थ सँक्युरिटी सिस्टीमचा वापर करण्यात यावा. जेणेकरुन यामुळे कोणी मुलगी संकटात असेल तर त्याचा हॉर्न वाजल्यावर सर्व सावध होतील. तसेच ही यंत्रणा संवेदनसील व अद्यावत असावी. शहारातील अवैध धंदे, तसेच गुंड प्रवृत्तीना आळा बसवण्यात यावा यासंदर्भात यासाठी स्फुर्ती बहुउद्देशीय संस्था, महीला, मुला, मुलीतर्फे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना लेखी निवेदन देण्यात आले.

पोलीस प्रशासनास निवेदन
तेच निवेदन जळगाव पोलिस अधिक्षक दत्तात्रय कराळे यांना देण्यात आले. पण ते हजर नसल्यामुळे त्यांचे नावे असलेले निवेदन चंदेल साहेब यांना देण्यात आले. स्व.अक्षरा हिचा परीवारही त्यावेळी उपस्थित होता. त्यांनीही नराधमाला फाशीची सजा व्हावा हा खटला सरकारी वकील अ‍ॅड.उज्ज्वल निकम यांच्याकडे सोपवावा, अशी मागणी तिच्या कुंटुबीयानी लावुन धरली.

यांची होती उपस्थिती
संस्थेचे अध्यक्ष पल्लवी भोगे, भुषण निकम, पत्रकार कमलाकर माळी, प्रा.वासुदेव पाटील, कोषाअध्यक्ष कल्पना वर्मा, सचिव शैलेस पांडे, माधुरी कुलकर्णी, चितांमनी फाऊंडेशनच्या रुपाली वाघ, दिपाली खडसे, प्रतिभा महाजन, विशाखा जोशी, रेवती नेमाडे, गायत्री नेमाडे, साधना प्रजापत, चेतन महाले, निखील पेंढारकर, दिनेश पाटी, प्रा.हेमंत सांळुखे, निवेदिता ताठे, सुनीता पाटील, वैशाली पाटील, पंकज कासार उपस्थित होते.