अत्याचाराच्या निषेधार्थ फैजपूरात कॅण्डल मार्च

0

फैजपूर:– तीन राज्यात झालेल्या अल्पवयीन बालिकांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ फैजपूर शहरातील जमाते हिंद शाखेतर्फ़े शहरातून शनिवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला.सुभाष चौकातून या कँडल मार्चला सुरुवात झाली. रॅलीच्या अग्रस्थानी लहान बालिकांनी निषेधाचा फलक धरला होतेता.

सुभाष चौक, कुरेशी मोहल्ला, कासार गल्ली, लक्कड पेठ, रथगल्ली, ब्राम्हण गल्ली, खुशालभाऊ रोड या मार्गाने हा कँडल मार्च निघून पुन्हा सुभाष चौकात आल्यानंतर त्याचा समारोप झाला. सर्व समाज बांधव, विविध पक्षांचे पदाधिकारी अबालवृद्ध मोठ्या संख्यने सहभागी झाले. रॅलीत उपनगराध्यक्ष कलीम मणियार, नगरसेवक डॉ.इम्रान खान, शेख इरफान, जमाते इस्लामीचे शहराध्यक्ष शेख अमाणू उल्ला, वेलफेअर पार्टीचे अब्दुल रुउफ जनाफ, एमपीजेचे जिल्हा उपाध्यक्ष शेख आमद, डॉ.मुदतस्सर, अबू बकर जनाफ, हाजी खालिद शेख व मोठ्या संख्येने नागरीक सहभागी झाले.