अत्याचारातून गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची विष घेऊन आत्महत्या

मुक्ताईनगर : अत्याचारातून गर्भवती राहिलेल्या अवघ्या 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीने विषारी द्रव पदार्थ प्राशन करीत आत्महत्या केली. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

विष प्राशन करीत आत्महत्या
मुक्ताईनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर तालुक्यातील एका गावात राहणारी 16 अल्पवयीन तरुणी कुटुंबासह वास्तव्यास होती शिवाय ती शासकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती. अल्पवयीन तरुणीशी नराधम आरोपीने शारीरीक संबंध ठेवल्यानंतर ती गर्भवती राहिली व या प्रकारानंतर तिने विषारी प्रकार समोर आला. या प्रकारानंतर अल्पवयीन मुलीने विष प्राशन करून आत्महत्या केली होती.

नराधम आरोपीचा पोलिसांकडून शोध
तत्पूर्वी अत्यवस्थ अवस्थेत तिला दाखल करण्यात आल्यानंतर तिच्या जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू होती व त्यादरम्यान तिची प्राणज्योत मालवली. तरुणीच्या मृत्यूनंतर तिच्या शवविच्छेदन अहवालात ती गर्भवती असल्याचे उघड झाल्याने बालकल्याण समिती, जळगावने याबाबत पत्रव्यवहार केला होता. याची दखल घेत तर मुक्तानगर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात हवालदार श्रावण जवरे यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करीत आहे.