जळगाव- अत्याचार प्रकरणातील पसार आरोपीला अटक करण्यात एमआयडीसी पोलिसांना यश आले आहे. संदीप शिवाजी सुरवळकर (40, तांबापुरा, जळगाव ह.मु.वसंत निवास, द्राक्ष बाग, साईबाबा मंदीराजवळ भांडुप, मुंबई) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. आरोपीविरुद्ध भादंवि कलम 376, 506 गुन्हा दाखल असून गुन्हा घडल्यानंतर आरोपी पसार होता. आरोपी शहरात आल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिस उपअधीक्षक सचिन सांगळे, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली एएसआय आनंदसिंग पाटील, कॉन्स्टेबल अशोक संगत, होमगार्ड पंकज सापकर यांनी अटक केली.