अत्याचार प्रकरणी तेली समाजातर्फे निषेध

0

एरंडोल । दोंडाईचा रेथे पाच वर्षीय बालिकेवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ एरंडोल तेली समाजाच्या वतीने तहसिलदार सुनीता जर्‍हाड व पोलीस निरीक्षक बाळासाहेब केदारे यांना निवेदन देण्यात आले. अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करणार्‍या तसेच नराधमास व त्यास संरक्षण देणार्‍या संस्था चालकांच्या विरोधात कडक कारवाई करून संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.

घटनेची सखोल चौकशी करा
दोंडाईचा येथील घडलेली घटना संपुर्ण मानव जातीला काळीमा फासणारी आहे. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येऊन नराधम शिक्षकांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी.या गुन्ह्याचा तपास विशेष पथक स्थापन करून करण्यात यावा, जलदगती न्यायालयात खटला चालविण्यात यावा, सर्व संशयितांविरुद्ध बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी, विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नेमणूक करण्यात यावी,पिडीत बालिका व तिच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत देवून त्याना संरक्षण देण्यात यावे,पालकांवर दबाव टाकणार्‍यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, सर्व संशयिताना त्वरित अटक करण्यात यावी, संस्थेची मान्यता रद्द करण्यात यावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. याबाबत योग्य ती कारवाई न झाल्यास समाजातर्फे रास्ता रोको आंदोलन करून मार्चा काढण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.

यांनी घेतला सहभाग
यावेळी समाजाचे तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, निंबा चौधरी, माजी नगरसेवक नथ्थू चौधरी, गुलाब चौधरी, माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी, डॉ.राजेंद्र चौधरी, शिवसेनेचे माजी विधानसभा क्षेत्र प्रमुख रमेश महाजन, किशोर निंबाळकर, नगरसेवक प्रा.मनोज पाटील, अशोक चौधरी, नगरसेवक बबलु चौधरी, हेमराज चौधरी, नगरसेविका सुरेखा चौधरी, मिना चौधरी, सुनील चौधरी, संजय चौधरी, लता चौधरी, गोरख चौधरी, उदयभान चौधरी, हरी चौधरी, रतन चौधरी, आनंदा चौधरी, शांताराम चौधरी, गणेश चौधरी आदी उपस्थित होते.