दापोडी मध्यवर्ती कार्यशाळा विभागाची कामगिरी
पिंपरी-चिंचवड : एस टी महामंडळाच्या दापोडी मध्यवर्ती कार्यशाळा विभागातूनच प्रथमच अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बांधण्यात आलेल्या माईल्ड स्टील बसचा लोकार्पण सोहळा मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पार पडला. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा राष्ट्र कृतज्ञता दिन सोहळा काल रविवारी (दि.20) मुंबई सेंट्रल येथे पार पडला. यावेळी माईल्ड स्टील बसचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत लोकार्पण करण्यात आले. यावेळी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, परिवहन राज्यमंत्री दिवाकर रावते, मुंबई एमएसआरटीसीचे व्यवस्थापकीय संचालक रंजीतसिंह देओल आदी उपस्थित होते.
11 गाड्यांचे उत्पादन
एस.टी. महामंडळात प्रथमच माईल्ड स्टील प्रकारच्या बस गाडी तयार करण्यात आल्या. दापोडी विभागातून अशा 11 गाड्यांचे उत्पादन घेण्यात आले. त्यापैकी एक गाडी मुंबई येथे लोकार्पण सोहळ्यासाठी पाठविण्यात आली होती. या बस बांधणीसाठी मध्यवर्ती कार्यशाळेचे व्यवस्थापक आर.जी.कांबळे यांनी नियोजन केले. तर सर्व अधिकारी आणि कर्मचा-यांनी यात मोलाचे सहकार्य केले.