अथर्व संगीत विद्यालयात रंगली दिवाळी पहाट

0

पिंपरी : सर्वांगीण शिक्षण प्रसारक मंडळ संचलित अथर्व संगीत विद्यालयात आयोजित केलेल्या पाच दिवसीय दिवाळी पहाटेच्या कार्यक्रमातील पहिल्या दिवसाची पहाट ह.भ.प.राजु महाराज ढोरे यांच्या गायनाने रंगतदार ठरली. पहाटे 6.00 वाजता सुरु झालेल्या या दिवाळी पहाट कार्यक्रमात राजु महाराज ढोरे यांनी प्रथम तुला वंदितो, प्रभाती सुर नभी रंगती, देव देव्हार्‍यात नाही, देह देवाचे मंदीर, तु माऊलीहुनी मायाळ, चंदनाचे हात पाय ही चंदन अशा रचना सादर करत प्रेक्षकांची दाद मिळवली. देवा हो सख्या पांडुरंगा या भैरवी रागातील अभंगाने कार्यक्रमाचा समारोप केला.

त्यांना हार्मोनियमवर ज्ञानेश्‍वर गाडगे, तबल्यावर अथर्व गाडगे, पखावजवर तुकाराम ढोरे तर टाळाची साथ दत्तात्रय बनकर यांनी केली.
कार्यक्रमाचे निवेदन व सुत्रसंचालन मुख्याध्यापिका जयश्री गाडगे यांनी केले तर आभार प्रदर्शन बालु महाजन यांनी केले