जळगाव : स्थायी सभेत अधिकारी चुकीची उत्तरे देत असल्याने आयुक्तांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी टाऊन प्लानिंग व आस्थापना विभागाचा कारभार भोंगळपणे सुरू असल्याचे सांगितले. याप्रसंगी स्थायी सभापती वर्षा खडके, शहर अभियंता दिलीप थोरात, नगरसचिव निरंजन सैंदाणे उपस्थित होते. हांजीर बायोटेक येथे शहरातील कचरा डेपो आहे. तेथे शहरातील कचरा जमा होत असतो. हा कचरा किती आहे याची मोजदाद करण्यासाठी वजनकाटा लावण्यात येणार आहे. त्यासाठी वजनकाटा दुरूस्ती करण्यात येणार आहे.
रस्त्यांच्या कामांना विलंब नको
शहरात अमृत योजनेची कामे सुरू होणार असल्याने रस्त्यांची दुरूस्ती होणार नसल्याने सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. अमृत योजना अजून सुरू झालेली नाही. या योजनेची टेंडर प्रक्रीया मक्तेदाराने आक्षेप घेतल्याने प्रलंबित होत आहे. यामुळे योजना पुर्ण होण्यास दिड वर्षांपेक्षा जास्त काळ लागणार आहे. यातच सदस्यांचा कार्यकाळ देखील संपणार असल्याने रस्त्या दुरूस्तीची कामे थांबवू नये अशी अपेक्षा सदस्यांनी व्यक्त केली. तर आयुक्त सोनवणे यांनी विभागीय आयुक्तांच्या निर्देशानुसारच काम सुरू असून यात काही बदल करावयाचा असेल तर विभागीय आयुक्तांची सदस्यांनी भेट घेवून आपली तक्रार नोंदवावि असे सुचलिवे. तसेच जे रस्त्यांचे खोदकाम केले जाणार नाही त्यांची काम करण्यास हरकत नसल्याचे शहर अभियंता भोळे यांना स्पष्ट केले.
पार्कींगच्या जागांची होणार सर्व्हेक्षण
शहरात बांधकाम परवानगी घेतांना पार्कींगसाठी बेसमेंट राखीव ठेवावी लागते. परंतु, बांधकाम करतांना पार्कींगसाठी राखीव जागा दाखवूनही तेथे व्यावसायिक वापर करण्यात येत असल्याची तक्रारी प्राप्त होत आहेत. अशा सर्व बांधकाम करण्यात आलेल्या पार्कींगच्या जागांचे सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना आयुक्तांनी यावेळी दिल्या. तसेच यापुढील बांधकामांना पार्कींगची स्वंतत्र व्यवस्था असल्यावरच मंजूरी देण्याचे आदेश आयुक्तांनी दिलेत. उज्वला बेंडाळे यांनी त्यांच्या वार्डांतील बीअरबारचालक हा रहिवाशी घरपट्टी भरत आहे. कर्मशिअल वापर होत असतांना रहिवाशी घरपट्टीबाबत तक्रार करूनही निकाली काढण्यात येत नसल्याने नाराजी व्यक्त केली. यावर आयुक्त सोनवणे यांनी टाऊन प्लानिंग विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढत नगररचनाकांना दिड महिन्यात तक्रारींचे निपटारा करण्याची सूचना केली. तसेच वेळेत कारवाई झालीच पाहिजे असे बजावले.
नितीन बरडे यांनी काही विषय पत्रिकेवर का आले नाहीत अशी विचारणा केली. यात त्यांनी बाँम्बेलॉज जवळील ट्रांन्सफार्मर हलविण्याच विषय दिलेला असतांना तो विषयपत्रिकेवर न आल्याने बरडे यांनी नाराजी व्यक्त केली. महानगर पालिकेच्या वेगवेगळ्या न्यायालयात केसेस चालु असून तेथील कामकाजाबाबत वेगवेगळे वकील नियुक्त करण्यात आले आहे. त्याच्यांत समन्वय नसल्याने उच्च न्यायालयातील सर्व केसेस अॅड. पी. आर. पाटील यांच्यावर्ग करण्याचे ठरविण्यात आले.