मुंबई : सीबीआयने आयकर विभागाचे सहाय्यक आयुक्त विवेक बात्रा यांच्या विरोधात सहा कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती प्रकरणी गुन्हा दाखल केला. सीबीआयने पाच शहरात 10 ठिकाणी छापे मारले. सीबीआयने बात्रा यांची पत्नी प्रियांका, अनेक उद्योगपती व सी.ए.च्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे. 1992 च्या भारतीय महसूल सेवेचे अधिकारी असलेल्या बात्रा यांनी 2008 ते 2017 दरम्यान 6.79 कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे.