अधिकाऱ्यांनो टेक्नोसॅव्ही व्हा

0

कल्याण | राज्यातील पहिली संगणकीकृत महापालिका अशी ओळख असलेल्या व त्यासाठी राज्य, केंद्र सरकारचे पुरस्कार मिळविलेल्या कल्याण डोंबिवली महापालिकेत (केडीएमसी) ई गव्हर्नन्सबाबत 17 वर्षांनंतरही अधिकारी मठ्ठच आहेत. संगणक आणि कर विभाग वगळता इतर सर्व विभागाचे कामकाज आजही कागदावरच चालते. समिती सदस्यांची माहिती तातडीने अपडेट करण्याचे श्रमही संगणक विभागाकडून घेतले जात नाहीत. त्यामुळे हताश पालिका आयुक्त पी. वेलारसू यांना शनिवारच्या आढावा बैठकीत हायटेक ओळख असललेल्या या पालिकेतील अधिकाऱ्यांना टेक्नोसॅव्ही होण्याचे आवाहन करावे लागले.

काय म्हणाले वेलारसू …
1. नागरिकांनी महापालिकेच्‍या वेबसाईटवर छायाचिञासह तक्रारी कराव्यात
2. प्राप्‍त तक्रारी संगणक विभागाने संबधित अधिका-यांना त्‍यांच्‍या भ्रमणध्‍वनी व ई-मेलवर पाठवून द्याव्यात 3. संबंधित अधिका-यांनी ठरवून दिलेल्‍या कालावधीत या तक्रारींचा निपटारा करुन तसा अहवाल पुन्हा संगणक प्रणालीवर टाकावा
4. संगणक प्रणालीवर प्राप्‍त झालेल्‍या तक्रारींचा आढावा दर 15 दिवसांनी स्वत: घेणार

पालिकेच्या ऑनलाईन सेवा
कर, पाणी बिले स्वीकारणे
जन्‍म-मृत्‍यू दाखले
विविध कर आकारणी
जनि/मनि सफाई
नागरिकांच्‍या तक्रारी

प्रक्रिया सोपी करा
प्राप्‍त तक्रारींचा निपटारा संबधित विभागांचे अधिकारी वा कर्मचा-यांकडून विहीत मुदतीत होतो की नाही, याची खातरजमा आयुक्‍तांनी केली. ऑनलाईन तक्रारींची प्रणाली सोपी करण्याच्‍या सूचना आयुक्‍तांनी संगणक विभागाचे उपायुक्‍त धनाजी तोरस्‍कर यांना दिल्या.