अधिकृत; VIVO चा आयपीएलसोबतचा करार रद्द

0

नवी दिल्ली: यंदा कोरोनामुळे भारतात होणारी आयपीएल स्पर्धा युएईत होत आहे. त्यातच चीन-भारत संबंध ताणले गेल्याने चीनी मालावर बहिष्कार घालण्याची मागणी होऊ लागली आहे. चीनी कंपनी असलेल्या VIVO ची आयपीएल स्पॉन्सरशिप रद्द करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियातून होऊ लागली आहे. दोन दिवसांपूर्वी VIVO ने आयपीएल करार रद्द करत असल्याचे सांगितले होते. मात्र भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून त्याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नव्हती. दरम्यान आज गुरुवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने VIVO सोबतचा स्पॉन्सरशिप करार रद्द केला आहे.

Vivo India ने 2017मध्ये 2199 कोटींत आयपीएलचे टायटल स्पॉन्सर हक्क मिळवले होते. त्यानुसात आयपीएलला एका वर्षाला Vivoकडून 440 कोटी मिळतात. यापूर्वी पेप्सिको ही आयपीएलची टायटल स्पॉन्सर होते आणि त्यांनी 2016मध्ये 396 कोटी रुपये दिले होते. Vivoची तीन वर्षांचा करार अजूनही शिल्लक आहे. बीसीसीआयनं सांगितले की,”बीसीसीआय आणि VIVO mobile India Pvt Ltd यांनी यंदा इंडियन प्रीमिअर लीगमधील भागीदारी रद्द करण्याचे ठरवले आहे. भारताचे चीनसोबतचे संबंध ताणले गेलेले असताना बीसीसीआय VIVO सोबतची स्पॉन्सरशिप कायम ठेवण्याच्या विचारात होते, त्यामुळे बीसीसीआयवर टीकाही झाली.