अधिक परताव्यासाठी क्रिप्टो करन्सी गुंतवणूकीत फसवणूक होऊ शकते?

सोनीटिक्स किंवा अन्य कोणत्याही कंपनीत गुंतवणूक

पुणे : कमी कालावधीत जास्त रिटर्न्स मिळविण्याच्या आमिषाने लोक सध्या मोठ्या संख्येने क्रिप्टोकरंसीमध्ये गुंतवणूक करीत आहेत. वेगाने वाढणार्‍या या प्लॅटफॉर्मवरही मोठ्या प्रमाणात घोटाळे देखील उघड होत आहेत. गेल्या वर्षभरापासून सुमारे 46 हजापेक्षा अधिक गुंतवणूकदारांना क्रिप्टोकरंसी घोटाळ्याचा फटका सला आहे. सध्या गुंतवणुकीसाठी वे 3 आणि क्रिप्टोकरंसीच्या पर्यायाची लोकांकडून चाचपणी होत आहे. कमी कालावधीत जास्त परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेक लोक असुरक्षीत समजल्या जाणार्‍या क्रिप्टोकरंसीकडे वळत आहेत. ही संधी हेरुन सायबर गुन्हेगारदेखील गुंतवणूकदारांची फसवणूक करून आपले उखळपांढरे करून घेण्यासाठी त्या दिशेने वळले आहेत. 2021पासून आतापर्यंत 46 हजार लोकांसोबत क्रिप्टोकरंसी घोटाळा झाला आहे. फेडरल ट्रेड कमिशननेच ही माहिती दिली आहे.

सायबर सेलकडून खात्री करणे गरजेचे
दरम्यान, महाराष्ट्र राज्यात सोनिटीक्स एक्सचेंज नावाने कंपनी सुरू झाली आहे. त्यांची नेटवर्क मार्केटिंग प्रमाणे रेफरल बोनसच्या नावाने जाहिरात केली जात आहे. सदर कंपनी ही देखील एक्सचेंज चालवीत आहे. कंपनीच्यावतीने राज्यभरात विविध ठिकाणी कार्यक्रम घेत असून लोकांना गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करत आहेत. जुन्या काही गुंतवणूकदारांचा अनुभव पहाता, या किंवा अशा अन्य कोणत्याही कंपनीत गुुंतवणूक करण्याआधी सायबर सेल सोबत खात्री करावी. जेणेकरून सामान्य लोकांची कष्टाचा पैसा अडकून फसवणूक देखील होणार नाही.

आधी कसा झाला आहे स्कॅम?
स्कॅममध्ये पैसे गमावलेल्या अनेक लोकांचे म्हणणे आहे, की याची सुरवात जाहिरात किंवा सोशल मीडिया मॅसेजने होते. गेल्या वर्षी क्रिप्टोकरंसीची क्रेझ खूप जास्त होती. जगभरातील लोक या डिजिटल चलनाकडे आकर्षित झाले होते. गेल्या वर्षी बिटकॉइन विक्रमी पातळीवर होते आणि कदाचित यामुळेच लोक क्रिप्टोकरंसीकडे आकर्षित झाले होते. प्राप्त अहवालानुसार, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामसह टॉप सोशल मीडिया अ‍ॅप्सवर क्रिप्टोकरंसी फसवणुकीच्या मुख्यस्थानी आहे.

कसा झाला स्कॅम?
स्कॅममध्ये पैसे गमावलेल्या जवळपास निम्म्या लोकांनी सांगितले, की याची सुरवात जाहिरात किंवा सोशल मीडिया मॅसेजने झाली. गेल्या वर्षी क्रिप्टोकरंसीची क्रेझ खूप जास्त होती. जगभरातील लोक या डिजिटल चलनाकडे आकर्षित झाले होते. गेल्या वर्षी बिटकॉइन विक्रमी पातळीवर होते आणि कदाचित यामुळेच लोक क्रिप्टोकरंसीकडे आकर्षित झाले होते. अहवालानुसार, इन्स्टाग्राम, फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप आणि टेलिग्रामसह टॉप सोशल मीडिया अ‍ॅप्सवर क्रिप्टोकरंसी फसवणुकीच्या केंद्रस्थानी आहे.

सोनीटिक्समध्ये गुंतवणूक करण्याआधी खात्री करा
महाराष्ट्र राज्यात सोनिटीक्स एक्सचेंज नावाने कंपनी चालू असून त्यांची नेटवर्क मार्केटिंग प्रमाणे रेफरल बोनसच्या नावाने जाहिरात होत असून सदर कंपनी देखील एक्सचेंज चालवित असल्याचे व महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी कार्यक्रम घेत असल्याचे दिसून आलेले आहे. त्यामुळे लोकांनी या बाबतीत सायबर सेल सोबत खात्री करून गुंतवणुक करावी जेणेकरून कोणत्याही सामान्य लोकांची फसवणूक होणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.