अधिग्रहित विहीर मालकांचे थकीत निधी देण्याची मागणी

0

अमळनेर । येथील पंचायत समिती कार्यालयात गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील अधिग्रहित केलेल्या विहीर मालकांना अनुदानाचे सुमारे 54 लाख रुपये थकीत आहे. तालुक्यात पाण्याची तीव्र टंचाई असल्याने सुमारे 23 गावात टँकर सूरु आहेत. परंतु डिझेलचे सुमारे 20 लाख थकीत रक्कम असल्याने ते डिझेल देणे बंद करीत असल्याने सामान्य नागरिकांचे हाल होतात तर विविध कारणासाठी निधी नसल्याचे कारण सांगितले जात असल्याने तालुक्यातील नागरिकांना आम्ही पदाधिकारी या नात्याने काय उत्तर द्यावे, असा प्रश्‍न पडला असून येत्या 8 दिवसात जर हा प्रश्‍न निकाली निघाला नाही तर उप मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे उपसभापती व पस सदस्य पदाचा राजीनामा देणाचा इशारा पं.स.च्या उपसभापती त्रिवेणीबाई शिवाजी पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाने दिला आहे.