जळगाव। उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात नविन विद्यापठीठ कायद्यानुसार अधिसभा निवडणुक घेण्यात येत आहे. निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला असून 16 सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येत आहे. विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयातील प्राचार्यांच्या गटामधून अधिसभेवर दहा जागा व व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटामधून अधिसभेवर सहा जागांसाठीची अंतिम मतदार यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
संलग्न महाविद्यालये व परिसंस्था यांच्या प्राचार्यांच्या गटातून अधिसभेवर दहा जागा निवडून देण्यासाठी प्राचार्यांची अंतिम मतदार यादी तसेच व्यवस्थापन प्रतिनिधींच्या गटातून अधिसभेवर निवडून द्यायच्या सहा जागांसाठी अंतिम मतदार यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे अशी माहिती उपकुलसचिव तथा निवडणूक शाखेचे विभागप्रमुख बी.बी.पाटील यांनी दिली.