दोंडाईचा । येथील माजी आमदार बापुसाहेब रावल यांनी निरा उत्पादनात वाढ व्हावी. त्यावर प्रक्रिया करून देश- विदेशात भारतीय निरा उत्पादन पोहचावे. निरा उत्पादक शेतकर्यांना चांगला भाव मिळावा तसेच राज्यात योग्य बाजारपेठ मिळावी. भारतीयांना आरोग्यदायक निरा सेवनाचे फायदे कळावेत यासाठी महाराष्ट्र राज्य निरा उत्पादक व प्रक्रिया शेतकरी महासंघाची स्थापना पुणे येथे केली. निरा उत्पादक पुणे येथे उपस्थित होते.
यावेळी निरा उत्पादन व प्रक्रिया विषयक अनेक विषयांवर चर्चा करण्यात येवुन विविध मागण्यांचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंन्द्रीय कृषी मंत्री शरदचंद्र पवार, राज्य उत्पादन शुल्कमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना निवेदन पाठविण्यात आले. यात निरा उत्पादकांच्या प्रमुख मागण्या अशा ’ निरा व निरा पासुन तयार करण्यात आलेल्या गुळाला शेतीमाल म्हणुन मान्यता द्यावी. तसेच त्यावरील सर्व निर्बंध हटविणे.
शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत
निरा लायसन्स मुक्त करणे. निरामध्ये मिनरल व व्हिटामीन असल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निराला मोठी मागणी असुन निर्यातीस प्रोत्साहन द्यावे. शिदींचे झाड क्षारयुक्त चोपन, पडीत व जिरायती जमीनीत कमी पाण्यावर येते. शिंदीच्या झाडामुळे रोजगार निर्मिती होईल तसेच शेतकरी कर्जमुक्त होवुन महाराष्ट्र आत्महत्या मुक्त होण्यास मदत होईल. निवेदनावर माजी आमदार बापूसाहेब रावल, पृथ्वीराज भोंगळे, अजित गिरमे, भरत शेलार, चंद्रशेखर शेलार,राजेंद्र लोंढे यांच्यासह शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.
भारतीय समाजात निरा उत्पादनाविषयी अनेक समज गैरसमज आहेत. मात्र निरा हे शंभर टक्के आयुवेदीक पेय असुन निर्सगाने मानवीय आरोग्यासाठी दिलेले अमृत आहे.माझ्याकडे सेंद्रीय शेतीवर आधारीत दोन ते अडीच हजार शिंदीचे झाडे असुन रोज पाचशे ते सातशे लिटर निरा निघते यामुळे अनेकांना आरोग्य तर युवकांना रोजगार मिळतो.
– माजी आमदार बापूसाहेब रावल