अनंतनागमधील चकमकीत दहशतवादी जुनैद मट्टूचा खात्मा

0

श्रीनगर। काश्मीर काश्मीर खोर्‍यातील अनंतनाग जिल्ह्यात झालेल्या चकमकीत भारतीय जवानांनी मोठे यश मिळवले आहे. सुमारे आठ तास चाललेल्या या चकमकीत भारतीय जवानांनी लष्कर ए तोयबाचा कमांडर जुनैद मट्टूसह दोन दहशतवाद्याचा खात्मा केला. भारतीय लष्कर, काश्मीर पोलिस आणि केंद्रिय राखीव सुरक्शा दलाने एकत्रितरित्या ही कारवाई केली. काश्मीरमधील बिजबहेडा भागातील एका गावात भारतीय जवानांनी शुक्रवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या दहशतवाद्यांना घेरले होते. मट्टूसाठी सरकारने पाच लाख रुपयांचे इनाम घोषीत केले होते. एका घरात तीन दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय जवानांनी अरवानी गावातील मलिक चौकातील या घराची नाकेबंदी करत दोन तास वाट पाहिली. या दरम्यान 10 वाजता या घरातून पहिली गोळी झाडण्यात आली. चकमक सुूरु व्हायच्या आधी स्थानिक युवकांनी जवानांवर दगडफेक केली. त्यांना रोखण्यासाठी जवानांनी पॅलेट गनचा वापर केला. त्यात पाच जण पॅलेट गनमधील छर्र्‍यांमुळे जखमी झाले. याआधी मागील महिन्यात जवानांनी हिजबुल मुजाहीदीनचा कमांडर सबजार अहमद बटला ठार केले होते. बटने गेल्यावर्षी झालेल्या चकमकीत मारल्या गेलेल्या बुरहान वानीची जागा घेतली होती.

इंटरनेट बंद करण्यात आले
काश्मीरमध्ये नव्याने फैलावत असलेल्या बेडरुम जिहादचा अनुभव भारतीय जवानांना या चकमकी दरम्यान आला. मट्टू आणि भारतीय जवानांमध्ये सुरू झालेल्या चकमकीच्यावेळीस या दहशतवाद्यांचा बचाव करण्यासाठी स्थानिक लोक झटकन जमा झाले होते. या लोकांनी भारतीय जवानांवर दगडफेक करण्यासाठी जास्तीत जास्त लोक गोळ व्हावेत म्हणून समाज माध्यमांवरुन तशास्वरुपाचे मेसेजेस व्हायरल व्हायला लागले.

कोण होता जुनैद मट्टू?
लष्कर ए तोयबाचा प्रमुख असलेला जुनैद मट्टू वानी गावातील रहीवासी होता. 3 जून 2015 रोजी तो दहशतवादी संघटनेत सहभागी झाला. उच्चशिक्शीत असलेला मट्टू हा टेक्नोसॅवी होता. गेल्यावर्षी जून महीन्यात दहशतवाद्याच्या एका गटाने अनंतनाग पोलिस स्थानकावर केलेल्या हल्ल्यानंतर मट्टू चर्चेत आला. त्यानंतर त्याच महिन्यात बीएसएफच्या बसवर झालेल्या हल्ल्यातही जुनैदचा सहभाग होता.