अनधिकृत ई-टिकीट काढणार्‍यास अटक

0

जळगाव । सतकर्ता विभाग मुंबई, भुसावळ क्राईम ब्रांन्च तसेच जळगाव आरपीएफ व वाणिज्य विभाग यांच्या संयुक्त पथकाने बुधवारी दुपारी 12.15 वाजेच्या सुमारास बालाजी पेठेतील तिरूपती टूर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स ई-टिकीट सेंटरवर छापा मारला. यात पर्सनल आयडीवरून अनधिकृत पणे 23 ते 24 हजार रुपयांचे ई-रेल्वे टिकीट काढल्याचे पथकाला सापडून आले असून पथकाने दुकन मालकाला अटक केली आहे.

अतुल क्षीरसागर, प्रशांत ठाकूर, के.बी.सिंह, आसाराम गव्होन, सुनिल बोरसे, जे.के.शेख, अमित बाविस्कर यांच्या पथकाने बुधवारी दुपारी बालाजी पेठेतील बालाजी पेठेतील बालाजी प्लाझामधील मयुर बाबुलाल सोनी यांच्या मालकीच्या तिरूपती टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स् या ई-टिकीट सेंटरवर छापा मारला. यावेळी त्यांना सेंटरचालकाने स्वतच्या आयडीवर अनधिकृतपणे रेल्वेचे आरक्षण ई-टिकीट काढण्याचे निषन्न झाले. यावेळी पथकाने लॅपटॉप तपासले असता 23 हजार रुपये किंमतीचे 7 अनधिकृत टिकीट काढल्याचे त्यांना मिळून आले. त्यानंतर पथकाने मयुर बाबुलाल सोनी यांना अटक करत संपूर्ण प्रकाराची चौकशी केली. तसेच पथकाने लॅपटॉप, प्रिंटर, चार्जर, 500 रुपये देखील ताब्यात घेतले आहे. यानंतर मयुर सोनी याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.