अनेक शैक्षणिक संस्था नगरसेवकांच्या
पिंपरी-चिंचवड : राज्य किंवा केंद्र शासनाची कुठलीही परवानगी न घेता शहरामध्ये अनधिकृतपणे शाळा चालविल्या जात असून महापालिकेच्या दफ्तरी मात्र अवघ्या 19 शाळांची नोंद आहे. मात्र, शिक्षण संस्था चालकांची नावे देण्यास शिक्षण मंडळाने नकार दिला आहे. यामागचे कारण म्हणजे यातील काही शाळा नगरसेवकांच्या असल्याची चर्चा आहे.
शाळांच्याही शाखा
या अनधिकृत शाळांमध्ये आरटीईचे कुठलेही निकष पूर्ण नसल्याचे आढळून आले आहे. मागच्या वर्षी एकूण 16 अनधिकृत शाळा होत्या त्यामध्ये वाढ झाली असल्याचे दिसून आले आहे. शहरातील काही शाळा मागील 20 ते 25 वर्षापासून अनधिकृत पध्दतीने शिक्षण देतात. त्यामध्ये दरवर्षी वाढ होताना दिसून येत आहे. यावर शासन कुठलाही निर्णय घेताना दिसून येत नाही. एका अनधिकृत शाळांच्या शहरामध्ये अनेक शाखा असल्याचे दिसून आले आहे.
शाळांची नावे अशी
2018-19 या वर्षीमध्ये अनधिकृत शाळांमध्ये मोशी परिसरातील ग्रँट मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल, मोशी प्राधिकरणातील स्मार्ट स्कूल, इंद्रायणी इंग्लिश मिडीयम स्कूल साई पार्क दिघी, बुध्दीस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल मोशी, मास्टर केअर इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरी आळंदी रोड, कमल प्रतिष्ठाण माऊंट विटराज स्कूल वाकड, ग्रँड मीरा इंग्लिश मिडीयम स्कूल चिखली, जयश्री इंग्लिश मिडीयम स्कूल चर्होली, मरिअम इंग्लिश मिडीयम स्कूल भोसरी, ज्ञानराज प्राथमिक स्कूल कासारवाडी, बुध्दीस्ट इंटरनॅशनल इंग्लिश मिडीयम स्कूल कासारवाडी, सेंट मेरीज ज्यूनिअर प्रायमरी स्कूल पिंपळे निलख,माऊंट कारमल पब्लिक स्कूल सांगवी, शुंभकरोती इंटरनॅशनल स्कूल चिंचवड गांधी पेठ, एंजल्स प्राथमिक स्कूल रहाटणी, ब्लू रोज इंटरनॅशनल स्कूल चिंचवड, बालगोपाल माध्यमिक शाळा पिंपरी, पर्ल ड्रॅप स्कूल पिंपळे निलख आदी शाळांचा यामध्ये सहभाग आहे.