जळगाव – आजच्या कलीयुगात मुली नकोशा असतात. मात्र जळगाव शहरात झालेला एका अनाथ मुलीचा शुभ मंगल विवाह आजच्या स्त्री जन्म हत्या करणार्या कटोरा मनवृत्तीला अपवाद ठरला असून; जळगाव जिल्ह्यातील आदर्शवत सुखदः घटना घटनाघडल्याने चर्चेला आली आहे. लहान असतानाच शहरातील बाल निरीक्षण गृहात वाढीस लागलेल्या अमळनेर येथील मूळ रहिवासी वैशाली दहिवदकर या अनाथ मुलीचा थाटात विवाह मंगल सोहळा पार पाडण्यात आला. आजच्या आधुनिकते मध्ये स्त्री जन्मा विरोधी फळी आजही टिकून आहे. अनाथ मुलीचा विवाह सोहळा पाहताना अनेकांना आनंद अश्रू तळतरले होते. आयोजित मंगल सोहळ्यात जिल्ह्यातील अनेक राजकीय ,सामाजिक , अधिकारी, कलावंत दानशूर लोकांनी विवाह सोहळ्यात उपस्थिती लावली होती.
यावल तालुक्यातील दीपक सोबत विवाह
लहान असताना वडिलांचे निधना नंतर वैशालीच्या आईला मानसिक धक्का बसल्याने आपली ओळख विसरली. यामुळे नऊ वर्षाची असतानाच वैशालीने पालकत्व हरविले होते. कमी वयातच दुःखाचा डोंगर चढत वैशालीने आपले शिक्षण बाल सुधार गृहात राहून पूर्ण केले. शासकीय वास्तू म्हणून पाहिली जाणारी बालगृहाची वास्तू आज एखाद्या मंगलकार्यालयाप्रमाणे नटली होती. आज तेथे गजराच्या घंटे ऐवजी सनई चौघडे वाजत होते. खास जळगावच्या पद्धतीतील वरण पोळी वांग्याची भाजी असे जेवण होते. वर दीपक हा चितोंडा ता. रावेर येथील सुभाष गंगाराम पाटील यांचा सुपूत्र आणि वैशाली ही अमळनेर येथील सुभाष बाळकृष्ण दहिवदकर यांची सुकन्या. आई वडीलांचे छत्र हरपल्याने वैशाली लहानाची मोठी जळगावच्या निरीक्षण गृहातच झाली. दीपक हा नाशिक येथे व्यावसायिक व्यापार करतो.तिचा भाऊ सौरभ ही बालगृहातच वाढतोय. 4 मे रोजी सकाळी 9. वा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जवळ असलेले बाल निरीक्षणगृहात वैशालीला हळद लावण्यात आली. सगळेच ज्या मंगल क्षणाची वाट पाहत होते. 12. 45 वाजता चि. सौ का वैशाली आणि चि. दीपक चे शुभमंगल झाले.
आशीर्वादाचा पाऊस
लग्न सोहळ्यात नववधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी सर्च स्तरातील मान्यवर उपस्थित झाले होते. जळगाव शहराचे आमदार सुरेश भोळे यांनी विवाहप्रसंगी हजेरी लावून नवदांपत्यास आहेर देऊन आशीर्वाद दिला. या सोबतच बाल व निरीक्षण गृह संचालक मंडळ, अधीक्षक, जिल्हा महिला बालविकास कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी, बालकल्याण समिती पदाधिकारी यांच्यासह सामाजिक संस्था, शहर व परिसरातील मान्यवरांनी हजेरी लावून विविध वस्तू भेटी देण्यात आल्या. वधू आणि वर अनाथ असल्याचा प्रसंग विवाह सोहळ्यात न दिसता एखाद्या शाही उत्सवा प्रमाणे वैशालीच्या शाही विवाह सोहळा पार पाडण्यात आला. कोणत्याही प्रकारची उणीव आयोजकांनी भासू दिली नाही.
संचालकांनी केले कन्यादान
लहान असताना बाल निरीक्षण गृहात राहिलेल्या वैशालीचे कन्यादान संचालक उमेश पाटील यांनी केले. अधीक्षिका जयश्री पाटील या वैशालीच्या आई तर सारिका मेतकर यांनी मावशीची जबादारी सांभाळली होती. मुलीची आई अथवा मावशी नसल्याची उणीव विवाह सोहळ्यात भासू दिली नाही. वधू वैशालीच्या नेहमी सोबत राहणार्या मैत्रिणी लग्नाच्या स्वागत समारंभा मध्ये सामील झाल्या होत्या. समाजातील दानशूर लोक या मंगल कार्याच्या मदतीसाठी धावून आले. जळगाव शहरातील विविध संस्था ,संघटनेचे पदाधीकारी , सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले प्रतिष्ठित मान्यवर विवाह सोहळ्यास उपस्थित होते. लहानाची मोठी बालगृहातच झालेल्या वैशालीची विदाई करतांना बालगृहातील तिच्या मैत्रिणी, अधिक्षिका, बालगृहातील कर्मचारी सार्यांचेच डोळे पाणावले होते.