इंदापूर । इंदापूर नगरपरिषद नगरसेवक अनिकेत वाघ यांचे विरोधात इंदापूर पोलिस निरीक्षक सजन हंकारे यांनी दाखल केलेल्या खोट्या गुन्ह्याची सखोल चौकशी व्हावी. यासाठी मंगळवारी (दि.10) सर्व पक्षियांच्या वतीने इंदापूर बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यास इंदापूरकरांनी शंभर टक्के प्रतिसाद देवुन शांततामय मार्गाने बंद ठेवुन निषेध नोंदविला.
राजकीय कारकीर्द संपविण्यासाठी खोटा गुन्हा
इंदापूर पोलिसांकडून कोणतीही शहानिशा न करता वाघ यांची राजकिय कारकिर्द संपविण्याच्या हेतुने वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचा खोटा गुन्हा दाखल केलेला आहे. या गुन्ह्यातील वेश्या व्यवसाय करणार्या महीला देखील संशयास्पद आहेत. तर बनावट ग्राहक बनुन जाणारा राहुल शेवाळे हा हंकारे साहेबांचा नातेवाईक असल्याची चर्चा आहे. राहुल शेवाळे व सदर महिला यांचे गुन्हा घडला त्या दिवशीचे फोन कॉल तपासल्यास सत्य उजेडात येणार आहे.
कंकारे यांची भूमिका संशयास्पद
यापूर्वी ही सजन हंकारे यांचे संशयास्पद कामगिरी विरूद्ध मागील महिन्यात तालुका काँग्रेसच्या वतीने हंकारे यांचे विरूद्ध इंदापूरात रास्ता रोको आंदोलन करून हंकारे याना सेवेतुन निलंबीत करण्याची मागणी करण्यात आली होती. तर बाभुळगाव येथिल राजेंद्र इंगळे व डॉ.लांबतुरे प्रकरण,व इतर आनेक प्रकरणात हंकारे यांची भुमिका संशयास्पद असल्याने त्यांची चौकशी करण्याची मागणी करुन निषेध नोंदवीण्यासाठी सर्व पक्षिय बंद पुकारण्यात आला होता.