अनिल कपूर झाले ६२ वर्षांचे !

0

मुंबई : बॉलीवूडचा एव्हरग्रीन स्टार अनिल कपूरचा आज ६२ वा वाढदिवस आहे. अनिल यांचा जन्म १९५६ला मुंबईमध्ये झाला. अनिल जरी वयाने मोठे झाले असतील तरीही ते मनाने अजूनही तरुणच आहेत. ‘हमारे तुम्हारे’ अनिलचा पहिला चित्रपट होता. या चित्रपटात अनिलचा अतिशय लहान रोल होता.

यश चोप्रा यांच्या ‘मशाल’ या चित्रपटानं अनिल कपूरच्या करिअरला ग्राफ मिळाली. ‘राम लखन’ चित्रपटातील ‘माय नेम इज लखन’ गाणं आजही लोक विसरले नाहीत. अभिनयासोबतच २००५ साली अनिलने निर्मिती क्षेत्रातही पाऊल टाकले. फक्त बॉलीवूडच नव्हे तर हॉलिवूडमध्येही अनिलने नाव कमावले आहे.