अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त भुसावळ शहरात विविध कार्यक्रम

0

भुसावळ । भुसावळ नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांच्या वाढदिवसानिमित्त शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 8 वाजेपासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत शहरातील विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. सकाळी 8 वाजता. अष्टभुजा मंदिरात देवीला माल्यार्पण करुन अष्टभुजा देवी मंदीरा सोमोर मित्रपरिवार व सर्वपक्षीय वाढदिवस समितीतर्फे 8.15 वाजता रक्तदान शिबीराचे उद्घाटन त्यानंतर 8.30 वाजता तारकेश्‍वर हनुमान मंदीराचे दर्शन, 8.45 वाजता कै. ह.भ.प. जगन्नाथ महाराज समाधीचे दर्शन, 9 वाजता शासकीय रुग्णालयात फळ वाटप, विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, 9.45 सत्कार समारंभ करुन केक कापण्यात येणार आहेत. त्यानंतर रावेर, फैजपुर, यावलमध्ये टिपॉईट जवळ अनिलभाऊ परिर्वतनमंचतर्फे 5 हजार लिटर पाणी टँकरचे लोकापर्ण, 10.15 वाजता फैजपुरात गरजुना थंडीचे ब्लॅकेंट वाटप करण्यात येणार आहेत. तसेच शहरातील महात्मा गांधी, बाबा साहेब अंबेडकर यासह इतर ठिकाणी भेट देवून माल्यार्पण करण्यात येणार आहे. दुपारी 4.30 वाजता साई बेकरीचे उद्घाटन करुन सत्यनारायण पुजाला उपस्थिती देणार आहेत. त्यानंतर सायंकाळी 7 वाजता जामनेर रोड वरील आनंद लॉन येथे आनिल चौधरी यांच्या सत्काराचे आयोजन केले आहे.