अनुष्का इतकी सुंदर भूमिका साकारायची की ते पाहून मला रडू कोसळायचं – कतरीना कैफ

0

मुंबई : ‘झीरो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात शाहरुख खान, अनुष्का शर्मा आणि कतरिना कैफ यांची मुख्य भूमिका असेल. शाहरुखच्या वाढदिवशी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आणि अल्पावधीतच सोशल मीडियावर त्याला भरभरून प्रतिसाद मिळाला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत कतरीना म्हणली अनुष्काने मला रडवलं.

‘झीरो’मध्ये अनुष्का एका अपंग वैज्ञानिकाची भूमिका साकारत आहे. अनुष्काची ही भूमिका कतरिनाला खूप आवडली आणि त्यामुळे तिचं शूटिंग पाहण्यासाठी ती सेटवर नेहमीच उपस्थित असायची. अनुष्काचं स्वत:ला भूमिकेत झोकून देऊन काम करणं तिला भावलं आणि तिचं वास्तववादी अभिनय पाहून कतरिना सेटवर भावूक व्हायची. ‘अनुष्का इतकी सुंदर भूमिका साकारायची की ते पाहून मला रडू कोसळायचं. तिचं भूमिका जगणं मला खूप आवडतं, असं ती म्हणाली.