अनु मलिक आता मराठी इंडस्ट्रीमध्येही

0

मुंबई : बॉलिवूडमधले एक मोठं गायक संगीतकार अनु मलिक आजवर असंख्य हिंदी चित्रपटांतील गाण्यांना आवाज व संगीत दिले आहे. त्यांना राष्ट्रीय पारितोषिक आणि फिल्मफेअर अॅवॉर्ड मिळाले आहे. आता अनु मलिक ‘आसूड’ या आगामी मराठी चित्रपटात आपल्या संगीताची जादू दाखवणार आहेत. हा चित्रपट येत्या ८ फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

गाण्यांमध्ये तबल्याचा वैशिष्ट्यपूर्ण वापर ही अनु मलिक यांच्या संगीताची खासियत आहे. आजही त्यांच्या गाण्यांवर तरूणाई फिदा असते. हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या अनु मलिक यांचे मराठी संगीतावरही विशेष प्रेम आहे. मराठी पदार्पणाबद्दल अनु मलिक म्हणाले कि, ‘मराठीत काम करण्यास मी उत्सुक होतो, ‘आसूड’ च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली हा मी माझा सन्मान समजतो. ‘आसूड’साठी संगीत देणं माझ्यासाठी खूपच वेगळा अनुभव होता’.