अनू मलिकच्या अडचणीत वाढ

0

मुंबई : गायिका श्वेता पंडितने गायक अनू मलिक यांच्यावर काही दिवसांपूर्वीच लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. आता श्वेतापाठोपाठच आणखी दोन महिलांनी अनू मलिकवर लैंगिक शोषण आणि गैरवर्तनाचे आरोप केले आहे. त्यामुळे अनु मलिकच्या अडचणीत वाढ झाली आहे.

या महिलेने एका मुलाखतीत म्हटलं, अनू मलिक यांच्या घरी गेली असता ते माझ्याशेजारी सोफ्यावर येऊन बसले. त्यावेळी त्यांच्या घरी कोणीही नव्हते, त्यांनी माझ्यासोबत गैरवर्तन करत माझा स्कर्ट वर करण्याचा प्रयत्न केला. त्यांना ढकलून मी दरवाज्याकडे पळण्याचा प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला. मात्र, इतक्यात कोणीतरी दरवाजा वाजवला, परंतु, याबद्दल कोणाला काहीही न बोलण्याची धमकी त्यांनी मला दिली, असं सांगत या महिलेने अनू मलिकवर लैंगिक शोषणाचे आरोप केले.