अनेक वर्षापासुनच्या प्रतिनियुकत्या सीईओंनी केली रद्द

0

जळगाव । जिल्हा परिषदेच्या कर्मचार्‍यांना प्रतिनियुक्त्या न देण्याचे आदेश आयुक्तस्तरावरून जारी झाले आहेत. प्रतिनियुक्ती द्यायची झाल्यास आयुक्तांकडून मंजूरी घेणे आवश्यक असताना जिल्हा परिषदेत अनेक कर्मचार्‍यांना पाहीजे त्या ठिकाणी नियमबाह्यरित्या प्रतिनियुक्त्या देण्यात आल्या आहे. प्रतिनियुक्त्या रद्द करण्यात करण्यात यावी अशी मागणी जिल्हा परिषद सदस्यांकडून होत होती. याची दखल घेत सीईओंनी प्रत्येक विभागाकडून प्रतिनियुक्त केलेल्या कर्मचार्‍यांचे प्रस्ताव मागविले आहे. प्रतिनियुक्तीया रदद्द करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून मंगळवारी 8 रोजी सर्व विभागाचे अहवाल आल्यानंतर सीईओंकडून निर्णय होण्याची शक्यता आहे.

स्पष्टीकरण द्यावे लागणार
जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विभागात कर्मचार्‍यांच्या सोयीनुसार प्रतिनीयुक्ती करून घेण्यात आली आहे. नियमानसुार आठवडे,दोन आठवडे प्रतिनियुक्ती असते. मात्र काही कर्मचार्‍यांची तर अधिकार्‍यांच्या सोयीसाठी तीन वर्षांपासून प्रतिनियुक्ती झाली असल्याची तक्रार होत होती. कर्मचार्‍यांच्या प्रतिनियुकत्या रद्द झाल्यानंतर त्यांना मुळ आस्थापनेवर रूजु करण्यात येणार आहे. त्यामुळे अनेक कर्मचार्‍यांची सबडिव्हीजनवर रवानगी होणार आहे. येत्या मंगळवारी सीईओ अहवालावर काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागून आहे.

ज्या विभागात कर्मचार्‍यांची निकड आहे, प्रतिनियुक्त्या रद्द केल्यास काम करताच येणार नाही अशी स्थिती होऊ शकते. त्यामुळे ज्या विभागात प्रतिनियुक्त्या रद्द करायच्या नाहीत त्या विभागाकडून सीईओंनी स्पष्टीकरण मागितले आहे. सिंचन विभागाबाबत आपण स्पष्टीकरण देणार असल्याचे अतिरीक्त सीईओ संजय मस्कर यांनी सांगितले. जिल्हा परिषदेत बांधकाम विभागात शाखा अभियंता असलेले के.आर.बरे व सहाय्यक अभियांत्रिकी संदानशिव हे गेल्या तीन वर्षांपासून एरंडोल व चाळीसगाव येथून प्रतिनियुक्तीवर आले आहे. बरे हे एरंडोल तर संदाशिव हे चाळीसगाव येथे मुळ आस्थापनेवर असताना त्यांना तात्पुरत्या स्वरूपात जळगावला प्रतिनियुक्ती देण्यात आली होती.