शिरपूर: तालुक्यातील अनेर नदीकाठी थाळनेर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या पथकाने धडक कारवाई करत गावठी दारूचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे. कारवाईत 2 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास 21 हजाराचा गावठी दारूचा मुद्देमाल हस्तगत केला.
यासंदर्भात थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांना गोपनिय माहितीद्वारे माहिती मिळाली होती. दरम्यान, याप्रकरणी संशयित आरोपी शरद रमेश कोळी (रा. घोडगाव, ता.चोपडा) यास रंगेहात पकडून ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.
शिरपूर तालुक्यातील भावेर शिवारात अनेर नदीच्या काठावर झाडाझुडपात मिळालेल्या माहितीवरून पोलीस ठाण्याच्या पथकाने धडक कारवाई करत 20 हजार 850 रुपयाची गावठी दारू, रसायन आदी मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलीस अधीक्षक डॉ.राजू भुजबळ, विभागीय पोलीस अधिकारी अनिल माने व थाळनेर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.काँ. सिराज खाटीक, विजय जाधव, रवींद्र पावरा, सुनील पगारे, होमगार्ड अनिल पावरा यांच्या पथकाने धडक कारवाई केली.