अनैतिक संबंधाच्या संशयाने पत्नीला संपवले

0

नांदेड – शांतीनिकेतन शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा राठोड यांच्या २३ ऑगस्ट रोजी सकाळी धारदार शस्त्राने खून केल्याची घटना घडली होती. खून प्रकरणी गुरुवारी रात्री उशिरा राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षाविरुद्ध किनवट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. वैशाली माने असे या महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षाचे नाव आहे.

तालुकाध्यक्षासह मुख्याध्यापिकेचा पती आणि इतर तीन म्हणजेच एकूण पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल आहे. पतीच्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याच्या कारणावरुन हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मयत सुरेखा राठोड यांचा भाऊ विलास जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पतीच्या अनैतिक संबंधास पत्नी अडसर ठरत असल्याच्या कारणावरुन या हत्येचा संगनमताने कट रचल्याचा आरोप केला आहे. यावरून किनवट पोलीस ठाण्यात पती विजय राठोड, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष वैशाली माने, अशोक टोपा राठोड, प्रमोद (अजय) थोरात, अनुसया टोपा राठोड (सासू) यांच्याविरुद्ध रात्री उशीरा भादंविच्या कलम ३०२ व १२० (ब) नुसार गुन्हा दाखल केल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सदाशिव चौधरी यांनी दिली आहे.

विजय राठोड यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस ठाण्यात विजय राठोडसह ६ अनोळखी युवकांना उभे करण्यात आले असता विजय राठोड यांच्यावर श्वान भूंकत होता. यामुळे हत्येच्या तपासाचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले आहेत. दरम्यान पोलिसांनी सुरेखा राठोड यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोकुंदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे