अनोख्या पद्धतीने केला रक्षाबंधन साजरा

0

जळगाव- शहरातील विविध शाळांतर्फे वेगवेगळे उपक्रम राबवून शनिवारी रक्षाबंधन मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली़ काही विद्यार्थ्यांनी स्वत:च राखी तयार करून कुणी झाडाला तर कुणी रिक्षाचालकांना राखी बांधली़

प्राथमिक विद्यामंदिर
मानवसेवा मंडळ संचलित प्राथमिक विद्यामंदिरातील कब बुलबुल पथकातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या हाताने राखी बनवून खोटेनगर बसस्टॉपवरील रिक्षा चालकांना राखी बांधून रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा केला़ या विद्यार्थ्यांनी बेटी बचाओ, बेटी पढाओ, वाहतुक सुरक्षा, पर्यावरण संवर्धन, पाणी वाचवा देश वाचवा, स्वच्छ शहर, जळगाव शहर अशा संदेशपर राख्या तयार केल्या होत्या़ दरम्यान, या कार्यक्रमापूर्व राखी बनविणे कार्यशाळा घेण्यात आली़ यात सुनील दाभाडे यांनी राखी कशी बनवावी यावर प्रात्यक्षिक करून दाखविले़ यावेळी माया अंबटकर, मुक्ता पाटील, योगिता घोलाणे उपस्थित होत्या.

आसोदा सार्वजनिक विद्यालय
आसोदा येथील सार्वजनिक विद्यालयातील हरित सेनेतर्फे पर्यावरणपुरक राखींचे प्रदर्शन भरविण्यात आले़ या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांनी सामाजिक, पर्यावरण विषयक व देशभक्तीपर संदेश दिला़ प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी पर्यवेक्षक मिलींद बागुल यांनी रक्षाबंधनाचे महत्व पटवून दिले़ दरम्यान, दिक्षा भोळे, दिव्या ढाके, राजश्री पाटील, जयश्री बाविस्कर व कोमल भारूळे, चंचल चौधरी, अश्विनी माळी, प्रमोद प्रजापती या विद्यार्थीनींचा उत्कृष्ठ राख्या बनविल्या म्हणून गौरव करण्यात आला़

श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालय
शनिवारी श्री संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयात रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला़ कार्यक्रमाच्या सुरूवातीला विद्यार्थीनींनी विद्यालय परिसरातील झाडांना राखी बांधल्या़ त्यानंतर वर्गातील विद्यार्थ्यांना राख्या बांधण्यात आल्या़ तोच मुलांनीही विद्यार्थीनींना भेटवस्तु दिल्या़ यावेळी मुख्याध्यापिका शितल कोळी, मुकेश नाईक, उज्ज्वला नन्नवरे, साधना शिरसाठ आदी उपस्थित होते़