जळगाव। सुरत रेल्वेमार्गावर 11 रोजी रात्री 9.30 वाजपुर्वी रेल्वेखाली आल्याने अनोळखी तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मंगळवारी रात्री पाळधी ते जळगाव सुरत रेल्वे मार्गावर खांब. क्र. 303/11-12 जवळ मृतदेह मिळून आला. डी.टी. तायडे, उपस्टेशन प्रबंधक जळगाव यांच्या खबरीवरून तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद झाली. तपास पो.कॉ. राजेंद्र बोरसे करत आहेत.