भुसावळ- रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक तीनवरील सी अॅण्ड डब्ल्यू कार्यालया जवळ एका 45 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. उंची 5 फूट 6 इंच, रंग काळा-सावळा, शरीराने सडपातळ, केस वाढलेले, चेहरा लांबट, नाक सरळ, डोळे मोठे असा वर्णन असून या प्रकरणी भुसावळ लोहमार्ग पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास एएसआय बाबुलाल खरात करीत आहेत.