अनोळखी महिलेचा संशयास्पद मृत्यू : मृतदेहाची ओळख पटवण्याचे आवाहन

Suspicious woman’s death in Bhusawal : Search by missing women in state for identification भुसावळ : शहरातील राष्ट्रीय महामार्गावर एका महिलेचा संशयित मृत्यू झाल्या प्रकरणी महिलेची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये हरवलेल्या महिलांच्या झालेल्या नोंदीची माहिती मागविली आहे. या माहितीच्या आधारे महिलेची ओळख पटवण्याचे काम बाजारपेठ पोलिसांनी सुरू केले आहे.

पोलिसांना महिलेचा खून झाल्याचा संशय
महामार्ग लगत असलेल्या राधाकृष्ण हॉटेलच्या पुढे एका महिलेचा निर्वस्त्र मृतदेह पडलेला होता. या प्रकरणी बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. महिलेचा चेहरा ऍसिड टाकून जाळण्यात आला होता. गेल्या आठ दिवसापासून महिलेचा मृतदेह तेथेच पडून होता. या प्रकरणी पोलिसांतर्फे मृत महिलेची ओळख पटवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

राज्यातील मिसिंग महिलांमधून ओळख पटवण्याचा प्रयत्न
जळगाव जिल्ह्यातील हरवलेल्या महिलांची नोंद पोलिसांनी सुरुवातीला पडताळून पाहिली, त्यातून काहीही माहिती हाती न आल्याने आता राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये महिलांच्या हरवल्याची नोंद झालेले प्रकरणांची माहिती बाजारपेठ पोलिसांनी मागवली आहे. यातून तपासाला दिशा दिली जात आहे. तर दुसरीकडे महिलेच्या डोक्यातली कवटी काढून तिचा चेहरा मुंबई येथील पोलिसांच्या लॅब मध्ये तयार केला जाणार आहे. त्यातून सुद्धा ओळख पटवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश भोई तपास करीत आहे. या महिलेबाबत कोणास काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन निरीक्षक गायकवाड यांनी केले आहे.