कासारवाडी : येथील रेल्वे सिग्नलजवळील ट्रकवर बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास एका 35 वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला. रेल्वेचा धक्का लागून त्या इसमाचा मृत्यू झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. कासारवाडी येथील रेल्वे सिग्नलजवळ मुंबईकडे जाणार्या ट्रॅकवर एक मृतदेह पडला असल्याची माहिती बुधवारी सायंकाळी पोलिसांना मिळाली. लोहमार्ग पोलिस आणि पिंपरी पोलिस त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला. मृताची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. पिंपरी लोहमार्ग पोलिस पुढील तपास करत आहेत.