पिंपरी-चिंचवड : प्रतिनिधी – शहरातील सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना घेण्याचे आवाहान, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं.भा.नारागुडे यांनी केले आहे. महाराष्ट्रात 5 ऑगस्ट 2011 पासून अन्न सुरक्षा मानदे कायदा 2006 व त्याखालील नियम व नियमावली 2011 अंमलबजावणी अन्न व औषध प्रशासन विभाग यांच्यामार्फत केली जाते. अन्न पदार्थ विक्री करणारे किंवा वितरण करणारे, अन्न पदार्थांची साठवणूक करणारे. तसेच अन्न पदार्थांची हाताळणी, उत्पादन, पॅकिंग, अन्न पदार्थाच्या व्यावसायामध्ये कमिशन एजंट करणारे.अन्न पदार्थांची वाहतूक करणारे, हॉटेल, व्यावसायिक, किराणा दुकानदार, मॉल्स, रसवंती गृह, स्नॅक्स सेंटर, हातगाडी व फेरीने खाद्यपदार्थ, अन्न पदार्थ विक्री करणा-या सर्व व्यावसायिकांना अन्न परवाना घेणे आवश्यक आहे. या सर्व अन्न पदार्थ व्यावसायिकांनी अन्न परवाना घेण्याचे आवाहन केले आहे. औंध ब्रेमन चौक, उद्योगभवन येथील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात, कागदपत्रांसह उपस्थित राहून अन्न परवाना घेण्याचे आवाहन, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त सं.भा.नारागुडे यांनी केले आहे.