नवी दिल्ली:लॉकडाउनच्या काळात परराज्यातील मजूर वेगवेगळ्या राज्यात अडकून पडली होती. त्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी केंद्र सरकारने विशेष रेल्वे गाड्या सुरू केल्या होत्या. त्यावरून स्थलांतरित मजुरांचा प्रश्न चिघळला. रेल्वेतून प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या होत्या. जेवण आणि पाणी न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत आहे. त्यावर आता रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी उत्तर दिले आहे. सर्वोच्च न्यायालयानेही यात लक्ष घातले होते. दरम्यान, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी रेल्वेसंदर्भात करण्यात आलेल्या सगळ्या आरोपांना उत्तर दिली आहेत. यात एकाही प्रवाशाचा अन्न-पाण्यावाचून मृत्यू झालेला नाही, असा त्यांनी केला आहे.
पूरे देश में किसी भी ट्रेन को 7 या 9 दिन नही लगे, ना ही किसी यात्री की भूख प्यास से मृत्यु हुई है। यात्रियों को 1.19 करोड़ से अधिक भोजन, व 1.5 करोड़ से अधिक पानी की बोतल रेलवे द्वारा दी गयी।
ट्रैक कंजेशन के कारण कुछ ट्रेनों को डाइवर्ट किया गया, जो कुल ट्रेनों का सिर्फ 1.75% हैं। https://t.co/BF5oBJFvyX
२१ दिवसांच्या पहिल्या लॉकडाउनमध्ये सर्व व्यवहार ठप्प झाले. त्यामुळे देशभरात विविध राज्यात काम करत असणाऱ्या मजुरांनी घराकडे स्थलांतर करण्यास सुरूवात केली. पायीच घरी जाणाऱ्या अनेक मजुरांना रस्त्यातच जीव गमवावा लागला. त्यामुळे सरकारनं लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू होण्यापूर्वी विशेष श्रमिक रेल्वे गाड्या सुरू केल्या. या गाड्यांमध्ये ८० पेक्षा अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा राजकीय नेत्यांकडून करण्यात येत आहे. रेल्वेसंदर्भात होत असलेल्या आरोपांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट करून उत्तर दिली आहेत.