अन्न व औषध प्रशासन खात्याचा पदभार जयकुमार रावलांकडे

0

मुंबई: आज राज्य मंत्रिमंडळात फेरबदल करण्यात आले आहे. पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट हे लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्याने त्यांच्याकडील पुण्याचे पालकमंत्रीपद महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तर जळगावच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आले आहे. दरम्यान गिरीश बापट यांच्याकडील अन्न व औषध प्रशासन विभागाचा पदभार पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांच्याकडे देण्यात आला आहे. संसदीय कामकाजमंत्रीपदाची जबाबदारी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना देण्यात आली आहे.