अन्न व सुरक्षा अधिकारी अहमदनगर एसीबीच्या जाळ्यात

0
पानटपरी चालकाकडून स्वीकारली 30 हजारांची लाच
अहमदनगर :- मावा विक्रीपोटी सहा महिन्यांची लाच म्हणून 30 हजार रुपये घेणार्‍या अहमदनगरच्या अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत शिवराज लोहार (38) यांना अहमदनगर एसीबीने रंगेहाथ अटक केली.
बुधवार, 31 रोजी ही कारवाई करण्यात आली. तक्रारदार पानटपरी चालक असून आरोपी लोहारी यांनी जुलै 2017 म्हणून त्यांच्या पानटपरीवर कारवाई केली होती तर त्यानंतर जानेवारी 2018 पर्यंतच्या कालावधीत प्रति महिना पाच हजार प्रमाणे 30 हजारांची मागणी केली होती.