…अन्यथा आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू !

0

शिवसेनेचा इशारा
निगडी :यमुनानगर येथील करसंकलन कार्यालयात मोकाट कुत्री बसलेली असतात. ही कुत्री रस्त्यावरुन जाणार्‍या नागरिकांवर हल्ला करत आहेत. या मोकाट कुत्र्यांवर कारवाई न केल्यास आयुक्तांच्या बंगल्यात कुत्रे सोडू, असा इशारा शिवसेना शहर संघटिका सुलभा उबाळे यांनी दिला आहे. याबाबत सुलभा उबाळे, शाखा प्रमुख गणेश इंगवले, उपविभागप्रमुख सतिश मरळ यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे.

या निवेदनात म्हटले आहे की, रंजना शामराव गोलांडे यांच्यावर गुरुवारी (दि.10) कुत्र्याच्या टोळीने हल्ला करुन त्यांना जखमी केले आहे. यापूर्वी वारंवार तक्रार करुनही अद्याप कोणतीही कारवाई केली गेली नाही. संपूर्ण यमुनानगर भागातील नागरिक व लहान मुले यामुळे त्रस्त झाली आहे. सारथी हेल्पलाईनवर सुध्दा या संदर्भात तक्रार नोंदविली आहे. तरी मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे आदेश संबंधित अधिकार्‍यांना द्यावेत. अन्यथा मोकाट कुत्रीच आयुक्तांच्या बंगल्यात सोडण्यात येतील.