मुंबई- मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने ठोस निर्णय घ्यावा, अन्यथा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन होऊ देणार नाही, असा इशारा मराठा संघटनांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मराठा संघटनांची आज मुंबईत बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या बैठकीमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 9 ऑगस्ट रोजी मराठा समाजाच्या राज्यव्यापी मोर्चा काढण्याची घोषणा करण्यात आली आहे. तसेच आरक्षणाबाबत योग्य निर्णय घ्या, अन्यथा हिवाळी अधिवेशन हाणून पाडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.