जळगाव । पुणे-मुंबई येथुन ऑनलाईन टॅक्सी सर्विसेस मध्ये फोनवर महागड्या कारबुक करायच्या अन् निर्जनस्थळावर चालकाला उतरवुन कार घेवुन पोबारा करायचे प्रकार प्रचंड वाढले आहे. जळगावसह राज्यभरात अशा पद्धतीने कारचोरीचे गुन्हे घडू लागले आहे. मुंबईहुन महागडी कार करुन पकडण्यात आलेला भामटा पोलिसांच्या कोठडीत असतांना असाच एक चोरीचा अशस्वी प्रयत्न झाला असुन चालकाने संबधीतास थेट पोलिस ठाण्यात आणुन पोलिसांच्या स्वाधीन केले. मुंबईतून भाड्याने टॅक्सीकरुन जळगावी आलेल्या भामट्यास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतला आहे.
पैसा नसल्याचा केला बहाणा
मुंबईतील मेरु’ टॅक्सीकॅब ला फोन करुन मुंबईतील भिवंडी नाका ते जळगाव पर्यंत ट्रॅक्सी करण्यात आली. पहाटे दोन वाजता टॅक्सी घेवुन आलेल्या चालकास माझी, आई-पत्नी, मुलांचा अपघात झाल्याचे सांगुन तातडीने त्या दिशेने जायचे सांगत त्यांची सहानुभती मिळवली. अपघातस्थळी जायचे सांगीतल्याने चालकाने कुठेही न थांबता कार चालवली. मुंबई ते जळगावपर्यंतच्या सर्व टोल नाक्यांचे पैसे टॅक्सीचालकानेच दिले, डीझेल पेट्रोलही टॅक्सी चालकाचेच मात्र जळगावी आल्यावर आपल्याकडे पैसेच नसल्याचे त्याने सांगीतले.
कारचालकाने प्रवाशास केले पोलिसांच्या स्वाधीन
जळगाव शहरात सकाळपासून कार घेवून इकडून तिकडे फिरवतोय मात्र पैसेही काढून दिले नाही, आणि नंतर परत मुंबई जाण्याचे सांगु लागल्याने कंटाळलेल्या टॅक्सीचालकाने कार थेट औद्योगीक वसाहत पोलीस ठाण्यात आणुन संबधीताला पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी प्रसाद दिल्यावर त्याचे नाव वैभव सतिष कपले (वय-36), असल्याचे त्याने सांगीतले. घडल्या प्रकाराचा घटनाक्रम गेल्या सहा महिन्यात औद्योगीक वसाहत पोलिस ठाण्यात दाखल तीन गुन्ह्यांच्या सारखाच असल्याचे समोर आले असुन पोलीस सखोल तपास करीत आहे. कारचोरीचा प्रयत्न आणि मागील दाखल तीन गुन्ह्यांच्या संदर्भात पोलीस कसुन चौकशी करीत आहे.
भिवंडी नाका येथुन स्विफ्टकार क्र(एमएच.03बीसी.3292) मध्ये वैभव सतिश कापले बसला..कसारा जवळ आई,पत्नी मुलांचा अपघात झाल्याचे तो, सांगत होता..खिश्यात पैसे नसल्याचेही म्हणाला. मात्र माणुसकीच्या नात्याने, न झोपता रात्रभर त्याला प्रवास करुन जळगावी आणले..वाटेतील सर्व नाक्यांचे पैसे मीच दिले..जळगावी आल्यावर रेल्वेस्थानकावर घेवुन गेला. येथे माझे नातेवाईक येणार असल्याचे सांगत त्याने चार तास उभा केला..मात्र कुणी आलेच नाही..आता परत मुंबईकडे नेण्याचे सांगतोय..गाडी चालवायला मागतो नाही दिली तर वाद घालतो .
जाकिर सत्तार काझी मेरु’ टॅक्सी चालक मुंबई
चालकाच्या हुशारीने वाचली कार
साडे चारशे किलो मिटरपर्यंत सलग कार चालवुन आणली. वाहन थांबले तरी, चावी काढून पुन्हा मीच गाडीवर बसलो. त्याने वारंवार तूम्ही झोपुन जा..मी चालवतो..असेही सांगीतले. चालकाने स्टेअरींगचा ताबाच सोडला नाही, अखेर टायर पंक्चर झाले काय..चहासाठी थांबु…येथुन पैसा घेवुन येतो असे अनेक बहाणेही केले. चालक जाकीर काझीने त्याचे कुठलेही म्हणणे ऐकले नाही. पुर्ण प्रवासात गाडी चालवण्याची एकही संधी मिळाली, त्यामूळे परत मुंबईकडे जाण्याचे सांगत होता. अखेर चालकाने थेट गाडी पोलिस ठाण्यात आणल्याने त्याची कार व तो सुखरुप असल्याचे पोलिसांनी सांगीतले.