…अन पोलिसांनीच उचलून नेले गर्भवती महिलेला रुग्णालयात

0

मथुरा- एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना होत होत्या. त्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यासाठी महिलेच्या पतींनी मदतीची मागणी केली. रुग्णवाहिका बोलविण्यात आली मात्र रुग्णवाहिका वेळेवर येत नसल्याचे पाहून एका पोलिसानेच चक्क महिलेला कडेवर घेऊन रुग्णालयात नेले. रुग्णालयात दाखल करण्यात आल्यानंतर त्या महिलेने एका बाळाला जन्म दिला.

एखाद्या सिनेमाप्रमाणे भासणारे हे प्रसंग आहे. हे प्रसंग आहे उत्तर प्रदेशातील मथुरा येथील. खाकी वर्दीतल्या या माणुसकीला पाहून सर्वच थक्क झाले.