अपंग बांधवांच्या मागण्यांसाठी ठिय्या आंदोलन

0

भिवंडी : भिवंडी महापालिका कार्यालयातील टेमघरपाडा येथील अपंग सहयोगी संस्थेतर्फे अपंग बांधवांसाठी असलेल्या सोयी सवलतींची वारंवार मागणी करूनही संबंधित महापालिका अधिकारी त्याकडे कानाडोळा करतात. प्रशासनाकडे संस्थेने 10 मागण्या केलेल्या आहेत. सदर मागण्या 30 जुलैपर्यंत महापालिकेने मान्य न केल्यास 31 जुलैपासून मुख्यालय प्रवेशद्वारापाशी ठिय्या आंदोलन करण्यात येईल असे अध्यक्ष वसंत कृष्णा नाईक यांनी सांगितले आहे. महापालिका क्षेत्रातील अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून जन्म-मृत्यू लेखाप्रमाणे त्यांच्या नोंदी ठेवणे, आरक्षित 3% निधी अपंगांच्या पुर्नवसनासाठी खर्च करणे, सवलतींच्या दरात गाळे उपलब्ध करून देणे या मागण्या करण्यात आलेल्या आहेत.