उल्हासनगर(सुनिल इंगळे): उल्हासनगर रेलवे स्थानकत अंध अपंग रेलवे प्रवाशी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत असल्याची तक्रार अपंग सेवा संघ व् कल्याण कसारा कर्जत रेलवे प्रवाशी संघटना यांनी रेलवे स्थानकतील तक्रार बुकात केली होती त्या तक्रारीची दखल रेलवे प्रशासनाने घेतली असून लवकरच अंध अपंग यांच्या समस्या सोडवन्यत येतील असे लेखी आश्वासन देण्यात आले आहे.
दिनाक 23 मार्च रोजी अपंगाचे नेते व् के 3 रेलवे प्रवाशी संघटना कार्याध्यक्ष भरत खरे यांनी सम्पूर्ण रेलवे स्थानकाची पाहणी करुण प्रथम समस्या अवगत करुण घेतल्या ,वेळ सायंकाल 7 ची असल्याने स्थानक प्रमुख नेहमी प्रमाणे 6 वाजता निघुन गेले होते ,अखेर खरे यांनी बुकिंग ऑफिसत तक्रार बुक घेवून त्यात रेलवे स्थानकतील प्रमुख समस्या नोंद केल्या. वास्तविक रेलवे प्रवश्यना सर्व सोई सुविधा पुरवने रेलवे प्रशासन चे गरजेचे असताना ते टालत असल्याचे जानवाले व् त्या प्रमाणे सर्व नोंदि करुण तशी प्रत प्राप्त केली. वरिष्ठ पातळीवर या सर्व बाबी वरिष्ठ अधिकारी यांनी तपासून लागलीच कामकाज सुरु केले ,स्थानकाच्या दोन्ही बाजूस अपंग डब्ब्यासमोर बेल लावण्यात आल्या ,आरक्षण केंद्र समोर अपंग व्यक्तिना रेम्प देखील लावले अश्या पद्धतीने काही प्रमाणात समस्या सोडविल्या मंडल रेल प्रबंधक वाणिज्य मुम्बई छत्रपति शिवाजी टर्मिनस विमल रॉय बी ए यांनी भरत खरे याना पाठविलेल्या पत्रकात म्हटले आहे की आपण दिलेल्या तक्रारी नुसार काही तक्रारी सोडवन्यत आल्या आहेत ,दोन्ही स्थानकत रेम्प बाबत आमचे इंजिनियर पाहणी केल्यावर ती सुविधा लवकरात लवकर पूर्ण करू असे कलविले आहे हा आपल्या के 3 रेलवे संघटनेचा विजय असल्याची प्रतिक्रिया अध्यक्ष राजेश घनघाव यांनी दिली