अपक्षांचा गट स्वतंत्र असेल ; काही अपक्ष आमदारांची भूमिका

मुंबई (मंत्रालय विशेष प्रतिनिधी) : राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडानंतर नव्या सरकारच्या हालचाली सुरू झाल्या. असे असले तरी या सरकारमध्ये आमचे अस्तित्व काय ? असा सवाल अपक्ष आमदारांनी उपस्थित केला आहे. शिवसेना बंडखोर कुठल्याही पक्षात विलीन व्हायचे असेल तर तो त्यांचा स्वतंत्र निर्णय आहे. अपक्ष आमदार म्हणून आमची अस्तित्व स्वतंत्र ठेवू अशी भूमिका काही अपक्ष आमदारांनी मांडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

एकनाथ शिंदेंसोबत अपक्ष आमदारांची बैठक
नवीन सरकार ध्ये शिवसेनेचा गटाला अनेक आश्वासने दिली गेली असे म्हटले जात आहे पण यात अपक्ष आमदार कुठे असतील याविषयी काहीही स्पष्ट होत नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. ही बाब निदर्शनास आणून देण्यासाठी एकनाथ शिंदे आणि अपक्ष आमदारांची एक बैठक होणार असल्याची माहिती मिळते