अपघातग्रस्तांना शासकीय मदत देणार

0

पुणे । नीरा-भीमा नदीजोड प्रकल्पांतर्गत बोगद्यात क्रेन तुटून झालेल्या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगीतले.इंदापूर तालुक्यातील अकोले येथे भिमा निरा स्थिरीकरण प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू आहे. बोगद्यातून कामगारांना वर घेऊन येताना क्रेनचे वायररोप तुटल्याने आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी घडली. अपघातग्रस्त ठिकाणची इंडस्ट्रीयल सेफ्टी तसेच इंरिगेशन अभियांत्रिकी, पोलिस आणि प्रशासनाने त्वरित पाहणी केली. या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना शासनातर्फे आर्थिक मदत देण्यात येणार आहे.

अपघात विमा योजनेतून मदत
आपघातात महाराष्ट्र तसेच आंध्रप्रदेश, उडीसा, राज्यातील कामगारांचा मृत्यू झाला असून शवविच्छेदनानंतर रेफ्रीजरेटर अ‍ॅम्ब्युलंसद्वारे त्यांचे मृतदेह गावी पाठविण्यात आले आहेत. संबंधीत मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहायता निधी, अपघात विमा योजना, तसेच संबंधीत कॉन्ट्रॅक्टरकडून मदत मिळवून देण्यात येणार आहे. तसचे परराज्यातील कामगारांना त्यांच्या जिल्ह्यातील जिल्हाधीकार्‍यांमार्फ आर्थिक मदत मिळवून देण्यासंदर्भात प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी दिली.