अपघातातील जखमीचाही उपचारादरम्यान मृत्यू

0

श्रीकृष्ण लॉन्सजवळ अपघात ; दुचाकीस्वाराचा झाला होता जागीच मृत्यू

जळगाव : शिरसोली रस्त्यावरील श्री कृष्ण लॉन्स जवळ मोटारसायकलला समोरून भरधाव वेगाने येणार्‍या डी.जे. बॅण्ड गाडीने दुचाकीला धडक दिल्याची घटना मंळवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कृष्ण लॉन्सजवळ पाचोरा जळगाव रोडवर घडली होती. या घटनेत महेंद्र शिवाजी पाटील रा. कुसूंबा याचा तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर दुसर्‍या दिवशी उपचार सुरु असताना यातील दुचाकीवर मागे बसलेला सागर प्रकाश पाटील वय 22 रा. कुसूंबा याचाही बुधवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

नातेवाईकांकडे लग्न असल्याने महेंद्र पाटील व सागर पाटील असे दोघे जण दुचाकी (एम.एच 19 2681) ने कुसुंबा येथुन वावडदा येथे गेले होते. लग्न सोहळा आटोपल्यानंतर दोघे जण परतीच्या प्रवासाला निघाले असताना पाचोरा जळगाव रोडवरील कृष्णा लॉनजवळ त्यांच्या दुचाकीला बॅन्डच्या चारचाकीने धडक दिली होती. यात यात महेंद्र पाटील याच्या डोक्याला व नाकाला जबर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यु तर सागर पाटील गंभीर जखमी झाला होता. महेंद्रचा सात दिवसांपूर्वी विवाह झाला होता.

उपचार सुरु असताना मृत्यू
जखमी सागर याच्यावर शहरातील ओम क्रीटीकल हॉस्पीटल येथे उपचार सुरु होते. उपचार सुरु असताना बुधवारी दुपारी सागरचाही मृत्यू झाला आहे. सागरचे हा मूळ राजवड ता.अमळनेर येथील आहे. 10 ते 15 वर्षापूर्वी कुटुंब कुसूंबा येथे स्थायिक झाले आहे. सागरचे वडील मजुरी करुन उदरनिर्वाह भागवितात. सागर हा चटईच्या कंपनीत काम करुन त्यांना हातभार लावत होता. सागरच्या पश्‍चात्त आई, वडील, अनिल व सुमित दोन भाऊ असा परिवार आहे. सायंकाळी शवविच्छेदनानंतर नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. हळद फिटत नाही तोच महेंद्रचा अपघाती मृत्यू झाल्याने कुटुंब दुःखांत असता त्याच्या जखमी मित्राचाही मृत्यू झाल्याने कुसूंब्यात हळहळ व्यक्त होत आहे.