अपघातातील दुसर्‍या तरुणाचाही मृत्यू

धुळे । कुसुंबा शिवारात रविवारी रात्री भरधाव वेगातील कार ( क्र.एमएच-18, डब्ल्यू 1811) ने व दूचाकी ( क्र.एमएच-18, बीपी 3775) यांच्यात अपघात झाला होता. त्यात चंद्रकांत हरिदास चौधरी (वय 22) हा तरुण ठार झाला.

 

योगेश पाटील हा गंभीर जखमी झाला होता. योगेश याच्यावर हिरे रुग्णालयात उपचार सुरू होते. त्याची प्रकृती सुरुवातीपासून गंभीर होती. उपचार सुरू असताना मंगळवारी योगेश याचाही मृत्यू झाला. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले.
……………………….