भुसावळ- भरधाव ओमनीने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना 5 जून 2011 रोजी भादली गावाजवळील उड्डाणपुलावर घडली होती. या खटल्यात संशयीत आरोपीची जळगाव न्यायालयाचे न्या.कांबळे यांनी सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. जळगावातील रवींद्र जावळे व त्यांच्या पत्नी सुनंदा जावळे या दुचाकीने जात असताना संशयीत आरोपी महेश दत्तात्रय सातव यांच्या वाहनाची धडक दुचाकीला लागून रवींद्र हे ठार झाले होते. या प्रकरणी सुनंदा रवींद्र जावळे (रा.जळगाव) यांच्या फिर्यादीनुसार सावत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. जळगाव न्यायालयात खटल्याचे कामकाज चालले. चार साक्षीदार तपासण्यात आले. दोन्ही बाजूचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने आरोपीची सबळ पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली. आरोपीतर्फे अॅड.अश्विनी डोलारे यांनी काम पाहिले.