चाळीसगाव । आमदार उन्मेष पाटील यांचे पाहुणे व शांतीदेवी चव्हाण पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य प्रशांत वाघ यांचे वडील राजेंद्र रंगराव वाघ (वय 55) राहणार मेहुणबारे यांच्या बजाज डिस्कव्हर मोटारसायकलला तालुक्यातील भोरस गायरान जवळ मागावुन येणार्या ईंडीका कारने धडक दिल्याने त्यांच्या पायाला व डोक्याला जबर मार लागला. त्यांना उपचारासाठी धुळे येथे हलवण्यात आले होते, आस्था हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असतांना त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरुन वरील चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असुन तपास पोलीस उपनिरीक्षक रमेश मानकर करीत आहेत.